आपण सर्वजण अत्यन्त प्रगतशील अश्या राष्ट्रात राहत आहोत.आपण भौतिक जगात खूप प्रगती करत आहोत.मागील दशकात खूप काही आधुनिक तंत्रज्ञान, संसाधने आपण निर्माण केली.
वैद्यकीय शास्त्रामध्ये पण खूप प्रगती झाली!!!!!
1) खरंच आपण खरी प्रगती करतोय❓❓❓❓..
2) आपण खरेच पहिल्यापेक्षा सुखी ,समाधानी आहोत❓❓❓
3) वैद्यकीय शास्त्र खरेच आपल्याला आरोग्य देऊ शकले आहे❓❓❓
कारखाने तयार झाले,पाणी सिंचन वाढले, लक्ष्मी(धन खरे तर माया) घरी आली व ती वाढत आहे पण पण पण..❗
4) पण खरी लक्ष्मी म्हणजे आरोग्य(शारीरिक व मानसिक) आपल्याला मिळाली आहे❓❓
सर्व प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत. याही गोष्टीचा विचार आपण करण्याची वेळ आली आहे..
साखर कारखाने, MIDC याने आर्थिक प्रगती नक्कीच झाली आहे यात दुमत नाही,नक्कीच आपली आर्थिक बाजू मजबूत झाली पण पण त्या बदल्यात आपण आजार तर विकत घेत नाही ना❓❗..
साखर कारखाने ,MIDC तील वेगवेगळ्या कँपन्या त्यांच्या वेस्ट प्रॉडक्ट,मळी, केमिकल युक्त पाण्याची शासकीय नियमानुसार प्रक्रिया करत नाहीत,विल्हेवाट लावत नाहीत आणि हेच केमिकल युक्त पाणी शेतात,ओढ्यात ,कॅनॉल मध्ये ओतून दिले जात आहे,हे खूपच दुर्दैवी व खेदजनक आहे,याचे गांभीर्य न कारखानदार,न शेतकरी, न वाहतूक करणारे ,ना प्रशासनाला😌❗❗❗
या केमिकल युक्त पाण्याने माती ,पाणी व हवा या सर्वांची वाट लागत आहे.याने सूक्ष्मजीव जँतु, प्राणी,पक्षी यावर वाईट परिणाम होत आहे पर्यायाने मानवावर पण विपरित परिणाम दिसू लागले आहेत..
पुढील काही वर्ष्यात घरोघरी कॅन्सर, मधुमेह,ब्लड प्रेशर,नपुंसकत्व(वंध्यत्व) असे इतरही आजार मागे लागले तर नवल वाटू देऊ नये
☘️ यावर उत्तर काय??/याला पर्याय काय❗❗
सामान्य नागरिकांनी/सर्वांनी मला काय करायचे ही मानसिकता सोडून जबाबदारी ने वागावे.साखर कारखानदार,MIDC कँपनी मालकांना सर्वांनी एकत्र येऊन ठणकावून सांगावे केमिकल चे पाणी शेतात,ओढ्यात, कॅनॉल मध्ये सोडू नये त्यावर प्रक्रिया करावी ,विल्हेवाट लावण्याची पर्यायी सोय करावी🙏☘️