दुष्ट व्रण |Gangrene In Marathi

0
Gangrene

जगभरात १९ कोटींहून अधिक डायबेटिस पेशंट आहेत. त्यातील अनेक पेशंटांच्या पायातील संवेदना कमी झाल्याने पायाला झालेल्या जखमा व त्यातील जंतूचा प्रादूर्भाव लक्षात येत नाही. त्यावर वेळीच उपचार न केल्यास जंतूसंसर्ग वाढून गँगरीन होऊ शकते. पुढे पायाची बोटे किंवा पायही कापावा लागतो.

देशात दर वर्षी गॅँगरीन झालेल्या 82 हजार जणांचे पाय जातात कापले जातात.तर जगात प्रत्येकी 3 सेकंदाला एकाचा पाय गँगरीनमुळे कापला जातो. आशिया खंडात गेल्या 1 वर्षात हे प्रमाण 57 टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती जागतिक स्तरावरील द लॅनसेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

मधुमेह झालेल्या रक्तवाहिन्यांच्या आजाराबाबत जनजागृतीच्या अभावामुळे पायाला जमखा होऊन त्यांचे रूपांतर गँगरीनमध्ये होते. गँगरीन म्हणजे, पायाला रक्तपुरवठा न झाल्याने तो भाग काळा पडून खराब होऊ लागतो. प्रत्येक अवयव कार्यरत राहण्यासाठी रक्ताचा पुरवठा होणे गरजेचे आहे. हे रक्त सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात सातत्याने पुरविण्याचे काम रक्तवाहिन्या करतात. हृदयाकडून हे सर्व रक्त पंप केले जाते. पण या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे अडथळा निर्माण होऊन म्हणजेच त्यात कोलेस्टेरॉल जमा होते आणि अवयवांचा रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे जसा हृदयाचा झटका येतो, त्याचप्रमाणो पायाला झटका येऊन गँगरीन होते कधी काही बोटा पुरते मर्यादित रहाते तर कधी संपुर्ण पाय प्रभावित करते.पायाला एखादी जखम झाल्यावर पेशंट दुर्लक्ष करतो.पण नंतर ही जखम बरी न होता आत खोलवर रक्तवाहिन्या चे कार्य प्रभावित करते मग तो भाग काळा पडून तेथून पू व जखम सडण्याची क्रिया होते.त्यावर वेळीच उपचार न केल्यास जंतूसंसर्ग वाढून गँगरीन होऊ शकते.मधुमेही रूग्णांमध्ये पायांच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामध्ये पायाला मुंग्या येणं, पाय दुखणं किंवा संवेदना न जाणवणं या समस्या दिसून येतात. असल्या समस्या जाणवायला लागल्यास वेळीच सावध होऊन डॉ ना भेटावे कारण मधुमेही रूग्णांच्या पायाला कमी प्रमाणात रक्तपुरवठा होत असल्याने पायाला झालेली जखम लवकर बरी होत नाही.

मधुमेहीनी पायाची विशेष काळजी घ्यावी.
दररोज पाय स्वच्छ धुवा
पायांची नियमितपणे तपासणी करा
पायाला जखम होऊ नये यासाठी वेगळ्या चपला वापरा
अनवाणी बाहेर पडू नका
गरम आणि थंडीच्या दिवसांत पायांची काळजी घ्या

-मधुमेहींसाठी आहाराच्या टीप्स
दही,साखर, गुळ किंवा मध आणि यांचे पदार्थ खाणं टाळा
सूरण, बटाटा आणि रताळं हे पदार्थ खाऊ नका
कमी आणि थोड्याथोड्या वेळाने काहीतरी खात रहा
उपवास धरू नका
दररोज वेगवेगळ्या भाज्या, फळं यांचा आहारात समावेश करा.चिकन सुप चालेल.
मद्यपान करणं शक्यतो टाळा.
-गँगरीन मध्ये ही तीन प्रकार असतात.
ड्राय गँगरीन, वेट गँगरीन, गँस गँगरीन.

गँगरीन तथा न भरणाऱ्या जखमांवरील प्रभावी उपाययोजना.

१)गावठी गाईचे गोमूत्र पाच सहा वेळा वस्त्रगाळ करुन त्यात हळद झेंडूच्या फुलांचा काळा बीजा चा भाग एकत्रित करून मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करा ती रोज लावत जा.
२)समुद्रशोक अथवा विधारा लँटीन नांवआर्जीरिआ नरवोसा Argyreia nervosa,इंग्रजी नांव Elephant Creep ची पाने वाटून कायाकल्प तेलात मिक्स करून ते त्यात गाळलेले गोमुत्रात हळद टाकून मिक्स करा.तत्पूर्वी कडूलिंबाचा रस व गोमुत्र याने जखम साफ करा.मग वरील मिश्रण जखमेत भरा.रोज दिवसात दोन तीन वेळा करा.सोबत जखम साफ करण्यासाठी डेटाँलचा वापर ही चालू शकतो.रोज ड्रेसिंग करा फरक पहा.गेलेले डँमेज झालेले सेल्स नवचैतन्य प्राप्त करतील. फक्त तुम्हाला हे करतांना मधुमेह नियंत्रणात आणावा लागेल.
३)वडाच्या कोवळ्या पारंब्या, हळद, कोरफड गर वाटून एकत्र करून त्या जखमेत भरावं.रोज साफ करावं जखम भरून पू बंद होईल.
४)लिंबाची साल सावलीत वाळवून वस्त्रगाळ करून एक चमचा रोज एकविस दिवस घ्या.
५)त्रिफळा चुर्णा ने जखम धूवावी.व हिंगाची पावडर टाकावी.
६)रक्त थांबण्यासाठी आवळा पावडर अथवा आवळ्याचा रस लावावा रक्त क्षणात थांबते.
७)जखम भरत नसल्यास साजूक तुपात काथ पावडर मिक्स करुन लावा जखमा भरतातच.
८)आवळा रस,हळद,व हिंग,काथ पावडर घातल्यास जखम न पिकता भरुन येते.
९)कोरफडीचा गर,कडुलिंबाचा रस,हिंग,काथ,हळद ,आवळा पावडर एकत्रित समभाग तूपात घालून जखमेत भरल्यास सडण्याची क्रिया थांबते.

आयुर्वेदिक उपाय

१)दशमुलारिष्ट व सरिवाद्यासव,रक्तदोषांतक (यान रक्त शुध्द होईल.) दोन दोन चमचे समभाग पाण्यात घ्या दोन वेळा.
२)महागंधक रसायन एक एक गोळी तीन वेळा पाणी व डायबेटीस नसल्यास खडीसाखरे बरोबर
२)चंद्र प्रभा वटी एक एक स.दू.सं.दूध साखरेत घेणे.
३)त्रिफळा चुर्ण गरमपाण्यात घेणे रोज रात्री एक चमचा.

Author

  • Ayurveda Expert, Aarogyam Ayurveda, "amrut villa",flat no-201, baner-balewadi road, Pune, Maharashtra, Pin-411045, Mob-9011077299

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here