तेल , वात आणि त्याला एखादा आधार मिळाला की अग्नी प्रगट होण्याची प्रक्रिया सुरू होते त्यात प्रथम वात थोडी जलते पचते आणि मग अग्नी आणि वायूच्या प्रेरणेने तेल संपे पर्यंत ती जलत राहून नंतर तेल संपून , त्यात पाणी इत्यादी पडून ,वात बिघडून , वारा लागून , इतर घटना / अपघात घडून अग्नी विझते .
तेज: pachati | ही क्रिया गर्भ शरीर तयार झाले वर 13 अग्निंचे ठिकाणी ते तेज स्थिर होवून पचनाचे काम करू लागते ; त्याला rudhaychya प्रेरणेने रस धातू मिळत राहून शरीर यापन होत राहते.
आत्मज भावा नुसार त्याचा कालावधी ठरतो .
त्यानुसार त्या मनुष्याला आहार निद्रा मैथुन इत्यादींची प्राप्ती होत जाते .
म्हातारपणी रसाचे यापन कमी कमी होत जावून सर्वच देह भावावर परिणाम होवून अग्नी मंद मंद होत जावून विविध अजिर्णा ने कालज मृत्यु घडून येतो .
आपल्याच शरीरात तयार झालेली आपलीच विष रूप द्रव्ये त्ाव्यतिरिक्त वेळी त्रासदायक होताना दिसतात , या मध्ये आगंतुक गोष्टींना थकत chlalele शरीराचं आणि अग्नीचे वैगुण्य च मूळ कारण रूप असते . जंतू , जिवाणू , विषाणू , बुरशी , रसातील विषारी वायू असा परिणाम करताना दिसतात , त्यावेळी त्याची योग्य चिकित्सा काही कालावधी पर्यंत उपयोगी पडताना दिसते , परंतु बल आदी घटकांचे खच्चीकरण झाल्याने कालांतराने शेवटी शेवटी पुन्हा तश्याच sampraptya घडत जातात .
असे न घडता जीवन चालू राहिल्यास रस धातू , प्राकृत वायू , सम अग्नी आणि काल यांच्या अनुरोधाने नियत आयु भोगून मृत्यु होतो .
नैसर्गिक अन्न हे स्वतः ला ही पचवून घेण्यास मदतच करीत असते .
Shwasachya प्रक्रियेत जशी आपली अर्धी फुफ्फुसे झाडावर पानांच्या रूपाने लटकली आहेत तसेच अग्नी देखील अन्ना मध्ये लपलेला आहे .
गुरु अन्न हा साक्षात आम च आहे .
आगंतुज हेतू मध्ये देखील स्थावर आणि जंगम कारणे स्थानिक अग्निना दूषित करीतच असतात , दोष गती अनुरोधाने नंतर त्याचा परिणाम जठराग्नी वर येणार आहे तो जसा वाईट येतो तसा चांगला देखील येत असतो .
Eg :- Ann लेपनाने shrir पुष्टी आणि अग्नी वर्धन , पादाभ्यंग करण्याने अग्नी वर्धन , vishuchiket parshni दाह करून अग्नी वृद्धी आणि samprapti भंग इत्यादी .
जल मह अा भूताचा ही भूताग्नि असतो हे एकदा लक्षांत घेतले की जठराग्नी विना आमोत्पत्ती कशी शक्य होते ते आपोआप स्पष्ट होते . आगंतूज कारणे ही रसाला आणि म्हणून पर्यायाने नंतर रक्ताला देखील बिघडवितात तेव्हा या जलीयत्वा चा विचार वरील प्रकारे करावा लागतो .
म्हणूनच वेगवेगळ्या पथोजेंस वर कार्य करणारी औषधे nirniralya सिस्टीम नुसार वैद्यांनी तयार करायला हवी आहेत असे वाटते .
तिसऱ्या आठवड्यात लिनियर हार्ट ट्यूब तयार होत असतानाच अग्नी आणि वायूची धडधड सुरू झालेली असते .
मूल पोटात मरण्या मध्ये आईचे मधुमेह , अतिरिक्त बीपी , गर्भाशयात म प्र होणे ,अपरेचे , कार्डचे आजार , जनमजात विकृती , जनुकीय कारणे , आवी थांबून गुदमरणे इत्यादी रस आणि प्राण नष्ट करणारी कारणे घडून च मृत्यु येतो ,
ब्रेन हार्ट बंद या बरोबर शांत झालेला अग्नी आणि वायू हे मृत्यु चे खरे कारण आपण धरायला हवे .
( पूर्वी गती ही प्रथम अग्नी सापेक्ष कशी योग्य आहे त्या विषयी देखील एका पोस्ट मध्ये लिहिले होते )
म्हातारे होवून अग्नीची अवस्था आणि आगंतुज कारणाने घडणारी अवस्था आधीच वर्णन करून झाली आहे .
विषे ही न पचताच व्यंवायी , विकासी गुणांनी प्राण हरण करतात , त्याचे स्थावर जंगम आदी प्रकार धतुप्रदुषण कर्म अंतर्गत या प्रकारे आयुर्वेदीय पद्धतीने अभ्यासल्यास काय चिकित्सेतील नीज आणि आगंतुज आमाला अगद तंत्रातील औषधे का उपयोगी पडतात ते ही समजणार आहे ,
या विषयी देखील आधी एकदा लिहिले होते .
आयुर्वेदातील अंतर्बाह्य चिकित्सेचा विचार वरील प्रकारे केल्यास कोण्या granthkarache काय मत आहे त्याचा गोषवारा घेवून स्वतः ही काही गोष्टींना नव्याने सुरवात करता येईल असे वाटते .
एक विचार म्हणून हे मांडले आहे मत भिंननतेचे स्वागतच आहे .
त्याने ज्ञान वाढणारच आहे .
Wa माध्यमाला मर्यादा असल्याने सर्वच लिहिता आलेले नाही . तरीही विषय महत्वाचा असल्याने लिहून काढले आणि पाठवले आहे .
🙏🌹