अभ्यंगम् आचरेत नित्यम्, स जराश्रमवातहा!
दृष्टीप्रसाद पुष्टी आयु:, स्वप्न सुत्वक दार्ढयकृत!!
अभ्यंग म्हणजेच सर्वांगाला तेल लावण्याचे फायदे व महत्त्व:-
जरा म्हणजे म्हातारपण आडवले जाते.श्रम थकवा घालवणयासाठी उपयोगी. वातहा वाताचे आजार/त्रास कमी होतो.पुष्टी शरीर धष्टपुष्ट होते.आयु: आयुष्य वाढते.स्वप्न झोप सुधारते/वाढते.सुत्वक दार्ढयकृत त्वचेची कांती वाढवून त्वचा निर्मळ निरोगी होते !!
जन्मलेल्या बाळाला भारतात किमान एक वर्ष पर्यंत रोज तेल लावून आंघोळ घालण्याची पद्धत आहे ती यामुळेच की त्याची झोप चांगली व्हावी शरीर धष्टपुष्ट व्हावं आणि आयुष्य वाढावे .
👉हे सर्वांसाठीच सांगितलेले आहेत त्यात कुठल्याही प्रकारे खंडन न पडणे अपेक्षित आहे मग शनिवार असो वा सोमवार.
👉आज प्रत्येकाला तरुण राहणे किमान तरुण दिसणे याचा अट्टाहास आहे परंतु त्यासाठी कष्ट करण्याची तयारी मात्र नाही.
👉रोज आपल्या शरीराला साबण लावून शरीराचा स्निग्धपणा त्याची कांती कमी होते. त्यामुळे किमान एक दिवसाआड तेल आणि एक दिवस आड साबण. साबणापेक्षा उटणे केव्हाही त्वचेसाठी जास्त उपकारक ठरणार यात शंका नाही.
👉एक दिवस आड शक्य नसले तरी किमान आठवड्यातून एक वेळा तरी सर्वांगाला तेल लावून मसाज करावे.
किंवा एक दिवस डोक्याला, एक दिवस पाठीला, एक दिवस हाताना, एक दिवस पोटाला छातीला एक दिवस पायांना अशा स्वरूपात तरी तेल लावत राहावे.
👉 रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकाला आतून 2-4 थेंब , कानात 2-4तेल कोमट करून टाकने, तळहात तळपाय यांना व माथ्याला थोडे थोडे तेल लावणे ते प्रत्येकाला सहज शक्य आहे.
👉वाताच्या प्रत्येक आजारात औषधी तेल लावण्याची यामुळेच योजना केलेली असते याशिवाय ताणतणाव कामाची दगदग कष्ट यामुळे मानसिक थकवा व झोप न येणे यावर मसाज खूप चांगला फायदा होतो.
👉खाण्यामध्ये तूप असेल तरच हा अभ्यांगाचा प्रकार फायदेशीर ठरतो.