पंचकर्म आणि स्वास्थ्य |Panchakarma and health in Marathi

0
panchkarm
panchkarm

पंचकर्म म्हणजे आयुर्वेदाने शरीरशुध्दीचे सांगितलेले उपाय-

१) बमन (उलटी करणे),

२) विरेचन (जुलाब)

३) नस्य (नाकात औषधी तेल, तुप, वनस्पतीचा रस इ.टाकणे)

४) बस्ती (शौचाच्या मार्गाने तेलतुप औषधी काढे इ. आत सोडणे )

५) रक्तमोक्षण (दुषित रक्त शिरेतून काढणे)

महत्त्व –
👉आज आपण खात असलेला प्रत्येक पदार्थ पित असलेले पाणी सुद्धा केमिकलयुक्त आहे. त्याचा आपल्या पचन व्यवस्थेव्दारा संपूर्ण शरीरावर अनिष्ठ परिणाम घडत असतो.
👉ग्रीष्म, वर्षा, शरद, शिशीर वमन द्या सहा ऋतूत कितीही खान्यापिण्याचे नियम पाळले तरी शरीरात वर्षा ऋतुत वातदोष, शरद ऋतुत पित्त दोष व वसंत ऋतत कफ दोष अती विकृतपणे वाढलल असतात. जे मानवी शरीरात वाताचे ८०, पित्याचे 40कफाचे २० रोग निर्माण करतात. प्रत्येक रोग वात, पित्त, कफ है अतिवाढल्यामुळे किंवा बिघाडल्यामुळे होतो. थोडक्यात वरील विवेचनवरून असे ठामपणे म्हणता यईल की, चुकीचे खाणेपिणे, बाह्य वातावरणातील बदल व शरीर मनाचे रोगयामुळे शरीरात साठलेले वात,पित्त,कफ बाहेर काढणे हा रोग निवारणाचा व स्वस्थ राहण्याचा आजच्या काळात अतिशय महत्त्वाचा व अनिवार्य उपाय आहे.

१) वमन -शरिरत वाढलेली कफाची धाण जठरात आणून उलटीव्दारे बाहेर काढण्याची पंचकर्म प्रक्रिया म्हणजे वमन!
कधी कधी अम्लपित्तासाठी व क्वचितच वातासाठी (अती ढेकर ) बाहेर काढणे यासाठीही वमन प्रक्रिया केली जात.

२) विरचन-शरीरात साठलेली पित्तची घाण लहान आतड्यात आणून जुलाबद्वारे बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे विरेचन !
पूर्वी वर्षातून एकदातरी एरंड तेल घेऊन जुलाब घडवण्याची एक पारंपारीक पध्दत महाराष्ट्रातील लोकात होती.

३) नस्य -बुध्दीचा अतीवापर करणाऱ्यामध्ये वात, पित्त, कफाची घाणडोक्याकडे जाऊन बसते तेव्हा ते जवळच्या मार्गान म्हणजे नाकाने औषध सोडून बाहेर काढणे अधिक सोयीचे ठरते. त्यास नस्य म्हणतात.

४) बस्ती – बोली भाषेत याला एनिमा म्हणतात. खर तर एनिमा मध्ये फक्त अडकलेली विष्ठा बाहेर काढणे अपेक्षित असते. बस्तीमध्ये आजारानसार औषधी तेल, तुप, काढे, दुधात आटवलेली औषधे विशिष्ठ संख्येने शरीरात गुद मार्गाने सोडली जातात.
त्याद्वारे आजार बाढवणारी शरीरातील वात, पित्त, कफाची घाण टप्प्याटप्प्याने बाहेर काढता येते. शरीराचे पोषण घडवण्याची औषधेही बस्तीने देता येतात.

५) रक्त मोक्षण-शरीरात वात, पित्त, कफाची घाण खूप तीब्र स्वरुपात वाढल्यास शरीर स्वतःच त्यांना बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते.

उदा. १) उन्हाळ्यात लेकरांचाघोणाळा फुटून नाकातून रक्त येते. २) पाळीमध्ये अंगावरचे खूप जाणे (रक्तप्रदर). ३) मसालेदार खूप खाल्ल्यामुळे मुळव्याधीतून रक्त जाणे.४) त्वचा विकारामध्ये (रक्त निघेपर्यंत) खाजवावे लागणे.

शरीराच्या या प्रतिसादाला लक्षात घेऊनच आजारी अवयव ओळखून विशिष्ठ क्रियेव्दारे रक्त काढण्याच्या प्रक्रियेला रक्तमोक्षण म्हणतात.
यासाठी जळू लावणे ही नैसर्गिक रक्तमोक्षण प्रक्रिया होय. पूर्वी तुंबढी लावणे हा प्रकारही खूप प्रचलित होते.

स्नेहन व स्वेदन – औषधी तेल तूप योग्य मात्रत पिण्यास देण व बाहेरुन मसाजसाठीही वापरणे, वाफेने (स्टीम बाथ) ने शरीरात पसरलेले दोष जवळच्या मार्गाव्दार बाहर काढण्यासाठी जठर, लहान आतडे, घश्यात आणण या प्रत्येक पंचकर्म करण्यायो प्रक्रिया आहेत.

  • उपयोग व फायदे – आयुर्वेदानुसार बलवान, “धष्ठपुष्ट आईवडिलांपोटी जन्मलेला, नियमान व्यायाम करणार्यास, रोज न चुकता तूप खाणारा, चिता, ताण तणाव रहीत जीवन जगणारा व्यक्ती सहजासहजी आजारी पडू शकत नाही. अशा अपवादांना सोडले तर जवळपास प्रत्येक व्यक्ती चुकीच खाण, पिण, वागणे, विचार करण यामुळे शरीरात कितीतरी वात, पित्त, कफाची घाण घेऊन जगत असतो. या वात पित्त कफाची घाण शरीरात आज ना उद्या गंभीर स्वरूपाचा व्याधी निर्माण होतोच.
    त्यामुळे ही घाण कमी असताना, कमी स्वरूपात व खूप वाढल्यास विधीवत काळजीपुर्वक मोठ्या प्रमाणात बाहेर काढल्यास आजार लवकर व पूर्णपणे कमी करणे सहज शक्य होत.

वमनान कफाचे २०, विरेचनाने पित्ताचे४० तर बस्तीने वाताचे ८० आजार १०० टक्के पुर्णपणे बरे होतात .आणि जुन्या खाण्यापिण्याच्या- वागण्याच्या चुका पून्हा नाही केल्या तर त्यांना आजार शक्यतो होतच नाही.
त्वचा विकारामध्ये अन्य पंचकर्मासह जवळच्या शीरेतून रक्त काढण्याने खुप लवकर फरक पडतो.तर वात, पित्त, कफानुसार योग्य औषध नाकात टाकल्याने नाका तोंडातून स्त्रावाच्या स्वरूपात घाण बाहेर पडून त्वचेवरील जवळपास सर्व आजार पूर्णपणे बरे होतात.
👉कोणताही आजार नसतानाही दरवर्षी कमी प्रमाणात वमन (फेब्रुवारीमध्ये/वसंत ऋतूत), विरेचन (शरद ऋत्/ऑक्टोबर) व बस्ती (वर्षा ऋत/जुनमध्ये) घेतल्याने आपण १००टक्के शरीर शुद्धीकरणाने भविष्यातील आजार व आजारावर होणारा लाखा रुपयाचा खर्च नक्कीच वाचवू शकतो….🙏😊

Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here